पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुमारे ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान   

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रिड मॉडेलवर चॅम्पियन्स चषकाचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली होती.पाकिस्तान क्रिकेट सध्या सर्वात वाईट काळातून जात आहे. अलिकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स चषकाचे आयोजन केले. या स्पर्धेद्वारे पाकिस्तानचे क्रिकेट सुधारेल अशी आशा होती, पण तसे काहीही घडले नाही.
 
पाकिस्तान लीग टप्प्यातच चॅम्पियन्स चषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला. याचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रिड मॉडेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली होती. स्पर्धेतील विजेत्या संघ भारताला त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळावे लागले. अट अशी होती की जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचली तर अशा परिस्थितीत हे दोन्ही सामने दुबईमध्ये खेळवले जातील. अगदी तसेच घडले.
 
पाकिस्तानी संघ लीग टप्प्यातून बाहेर पडला. त्यामुळे यजमानपद असूनही पाकिस्तान अंतिम सामन्याचे आयोजन करू शकला नाही. आयसीसी चॅम्पियन्स चषकाचे आयोजन करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या क्रिकेट स्टेडियमचे नूतनीकरण करण्यासाठी खूप पैसे खर्च केले. परंतु पीसीबीला त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा एक अंशही वसूल करता आलेला नाही.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.खेळाडूंच्या सामन्याच्या फी आणि पंचतारांकित हॉटेलमधील त्यांच्या राहण्याचा खर्च कमी करण्याबद्दल बोलत आहे.
 
एका अहवालानुसार, आयसीसी चॅम्पियन्स चषकाचे अयशस्वी आयोजन केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुमारे ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात हे ८६९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत, पीसीबी आपली स्थिती सुधारण्यासाठी खेळाडूंची मॅच फी आणि हॉटेल सुविधांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Related Articles